Vande Bharat Express : ‘वंदे भारत’चा सांगलीला ठेंगा अन् साताऱ्याला थांबा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । वंदे भारत एक्स्प्रेसचे (Vande Bharat Express) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत मुंबई ते कोल्हापूर दि. 17 डिसेंबर रोजी उद्घाटन करण्यात येणार आहे. मात्र, या गाडीला सांगली स्थानकात थांबा न देता सातारा स्थानकावर थांबा देण्यात आलेला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्याच्या अनुषंगाने ही महत्वाची बाब आहे.

सध्या मुंबई ते कोल्हापूर मार्गावर सुरू असलेल्या सर्व रेल्वे गाड्यांमध्ये कोल्हापूरपाठोपाठ सांगली रेल्वे स्थानकावरून सर्वाधिक तिकिटांचे बुकिंग होत असते. कराड व किर्लोस्करवाडी रेल्वे स्थानक दुसऱ्या क्रमांकावरचे उत्पन्न देत आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगली व किर्लोस्करवाडी या दोन सर्वाधिक उत्तम उत्पन्न देणाऱ्या रेल्वे स्थानकावर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला (Vande Bharat Express) थांबा दिला नाही.

‘वंदे भारत’ सेमी बुलेट ट्रेन : Vande Bharat Express

५ हजार कोटी खर्च करून पुणे – सांगली – लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण करण्यात आले. जेणेकरून पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सांगलीसारख्या प्रमुख महानगराला जलद रेल्वे गाड्यांचा संपर्क मिळावा. सांगली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पुणे – लोंढा दुपदरीकरण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत. तरीही याच सांगली जिल्ह्यातील जिल्हा मुख्यालय असलेल्या सांगली रेल्वे स्टेशनवरून ‘वंदे भारत’ सेमी बुलेट ट्रेन सुसाट निघून जाणार आहे.

अमृत भारत योजनेत सातारा रेल्वे स्थानकाचा समावेश

रेल्वे अर्थसंकल्पांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या अमृत भारत योजनेचा भाग म्हणून पुनर्विकास करण्यात येणाऱ्या स्थानकांच्या यादीत कोल्हापूर, मिरज, सांगली यांच्यासह महत्वाच्या सातारा आणि कराड या रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला आहे.