कराड प्रतिनिधी । कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर ठेकेदार असलेल्या डीपी जैन कंपनीच्या सुमारे ८५ टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती. या घडलेल्या घटनेनंतर आज बुधवारी सकाळी कराड मधील अज्ञात तरुणांनी ठेकेदाराची क्रेन व २ पोकलँडच्या काचांची तोडफोड कारल्याचा धक्कादायक प्रकार घडला.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड येथील ठेकेदार कंपनी असलेल्या डीपी जैन या कंपनीच्या पोकलेनच्या टायर वरती डिझेल टाकून क्रेन पेटवून देण्याचाही प्रयत्न रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी केला. मात्र, पावसामुळे त्यांचा पर्यटन निष्फळ ठरला. त्यानंतर त्यांनी क्रेन व त्याठिकाणी असलेल्या इतर वाहनांच्या काचा फोडत नासधूस केल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे.
या घडलेल्या प्रकाराची माहिती कराड पोलीस पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील व त्याच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली. या उघडलेल्या घटनेमुळे कराड शहरात पाणीप्रश्न चांगलाच पेटला असल्याचे दिसून आले.