वंचित बहुजन आघाडीच्या कराडच्या माजी शहराध्यक्षासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी (भारिप बहुजन महासंघ) चे माजी कराड शहर अध्यक्ष अमोल काटरे (बाळासाहेब) यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांनी आज कराड भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा भाजपा सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले यांच्या हस्ते अमोल काटरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भाजपा कराड शहर उपाध्यक्ष श्री. अभिषेक भोसले यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आज कराड येथे कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी डॉ. अतुल भोसले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व इतर विषयांवर चर्चा केली.

यावेळी माजी अध्यक्ष अमोल काटरे (बाळासाहेब), उपाध्यक्ष आकाश कांबळे, खजिनदार हर्षल सरगडे, सचिव तेजस सपकाळ व कार्यकारणी सदस्य व स्वप्नील चंदनशिवे,संजय चंद्रकांत कांबळे, हर्ष कांबळे, शेखर कांबळे,अक्षय जालिंदर कांबळे, अक्षय शिवाजी कांबळे,विकी वाघमारे, मंगेश वीर, वैभव आवळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.