सातारा प्रतिनिधी | उन्हाची दाहकता वाढली आहे. खेडोपाडी तसेच शहरांमध्ये देखील पाण्याची टंचाई तीव्र भासत आहे. अशा परिस्थितीत सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्यानं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेलं आणि पाण्याची नासाडी झाली.
साताऱ्यात उताराला असलेल्या गुरूवार बागेच्या लगत नगरपालिकेच्या पाणी पुरवठा टाकी आहे. त्या टाकीचा व्हॉल्व्ह तुटल्यानं पाणी उद्यानात शिरलं आणि उद्यानाला धबधब्याचं स्वरूप आलं. उद्यानातील पाणी रस्त्यावरून वाहू लागल्याने ऐन उन्हाळ्यात रस्ते जलमय झाले. पाणी वाहन जाताना पाहून नागरीकांनी नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, ही घटना पाहणारी महिला टाकीतून मुद्दाम पाणी सोडून दिलं असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे.
उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच सातारा शहरातील अनेक भागात पाणी टंचाई जाणवत होती. त्यावेळी नागरीकांनी आंदोलन देखील केलं होतं. दरम्यान, गुरुवार बागेत पाणीच पाणी आल्याची माहिती मिळताच आजुबाजूच्या नागरिकांनी नागरिकांनी बागेकडे धाव घेऊन पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.