संगम माहुलीतील महाराणी ताराराणींच्‍या समाधीला वज्रलेप; समाधीच्या चिरांचं आयुष्य वाढलं 50 वर्ष

0
348
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | महाराणी ताराराणी यांचे निधन इसवी सन १७६१ मध्ये साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची समाधी संगम माहुली येथे बांधण्यात आली होती. दरम्यान, त्यांच्या समाधीच्या चिराना मंदिर वज्रलेपासाठी प्रसिद्ध असलेल्या गौरव घोडे यांच्या श्री स्वामी ओम मल्हारी प्रतिष्ठानच्या वतीने वज्रलेप प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रक्रियेमुळे या समाधीच्या चिरांचे आयुष्य ५० वर्षांनी वाढले आहे. प्रतिष्ठानने महाराणी ताराराणी यांच्या समाधीची महाआरती आणि विशेष पूजा केली.

महाराणी ताराराणी यांची समाधी संगम माहुली येथे असून ती दगडी रचना उघड्या स्वरूपात होती. गेल्या १५ वर्षांत या समाधीच्या संवर्धनाचे व जीर्णोद्धारासाठी आश्वासनेच दिली जात होती. प्रत्यक्षात काहीच झाले नाही. कृष्णा नदीच्या पात्रात वाळूत ही समाधी पुराच्या पाण्यामुळे गाडली गेली होती. काही संघटनांच्या पाठपुराव्यामुळे ही समाधी पुन्हा चर्चेत आली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही या समाधीचा जीर्णोद्धार करण्याबाबत सूतोवाच केले आहे. दरम्यान, या समाधीच्या दुरवस्थेबाबत समाज माध्यमांतून आवाज उठवला गेला. त्यानंतोर याबाबतची माहिती गौरव घोडे यांच्यापर्यंत गेल्यावर त्यांनी तातडीने आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून माहुली येथे येऊन या समाधीच्या दगडी चिरांना वज्रलेप केला.