सातारा प्रतिनिधी | पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी १० सप्टेंबर १९४४ ला सातारा जिल्हा कारागृहाच्या तटावरून टाकलेल्या उडीला ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित केलेल्या शौर्य दिनानिमित्त सातारा मध्यवर्ती कारागृहासमोर नुकताच एक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी स्वातंत्र्यवीरांचे शौर्य, तो इतिहास आपण लक्षात ठेवला पाहिजे. तो आपण विसरता कामा नये. ती स्फूर्तीच खरी आपली प्रेरणा आहे. सातारा प्रतिसरकारने स्वातंत्र्य चळवळीमध्ये दिलेले योगदान सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यासारखे आहे, असे प्रतिपादन वाळव्याच्या हुतात्मा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केले.
कार्यक्रमासाठी सातारा येथील प्रतिसरकार समन्वय समितीचे प्रा. विश्वंभर बाबर, प्रा. दत्ताजी जाधव, विजय मांडके, विजय निकम, स्वातंत्र्यसैनिकांचे अनेक वारसदार तसेच हुतात्मा शिक्षण उद्योग समूहातील सर्व संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वैभव नायकवडी म्हणाले, ”भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये सशस्त्र सेना उभी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे ध्येय होते. डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या विचाराने सशस्त्र क्रांती केली. या आंदोलनामध्ये त्यांना ब्रिटिशांच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर कारागृह फोडून ते भूमिगत झाले. तत्कालीन इंग्रज सरकारला सामान्य जनता आणि क्रांतिवीरांनी सळो की पळो करून सोडले होते. त्यानंतर ते देश स्वतंत्र होईपर्यंत ते ब्रिटिशांच्या हाती लागले नाहीत.