बोगस कागदपत्रांद्वारे केली जमीन बिगरशेती; हिंदकेसरी पैलवानासह दोघांना अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राजाचे कुर्ले, ता. खटाव येथे ग्रामपंचायतीचा बोगस ग्रामसभा ठराव आणि ना हरकत दाखला सादर करून गावातील जमीन बिगरशेती केल्याप्रकरणी हिंदकेसरी – पैलवानासह दोघांना वडूज पोलिसांनी अटक केली आहे.

हिंदकेसरी पैलवान संतोष पांडुरंग वेताळ (रा. सुर्ली, ता. कराड जि. सातारा) व आनंदा शंकर मोरे (रा. शिवाजी नगर ता, कड़ेगाव जि. सांगली) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ग्रामपंचायत सरपंच राजे भोसले आणि सदस्यांच्या तक्रारीवरून वडूज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत राजाचे कुर्ले येथे जुलै २०२२ मध्ये गावातील गट नं. १४७१ मधील बिगर शेती परवान्याबाबत सरपंचांनी माहिती अधिकाराखाली अर्ज करून कागदपत्रे मागवली होती. या कागदपत्रांची तपासणी केली असता यामध्ये ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला व ग्रामसभेचा ठराव बोगस असल्याचे आढवून आले. जमीन एन ए करण्यासाठी आनंदा मेरे यांनी ना हरकतसाठी कसलाही मागणी अर्ज केला नव्हता. त्यामुळे संशयितांनी स्वतःचा फायद्यासाठी बनावट सही व शिक्क्यांचा वापर केला असल्याचे उघड झाले. त्यामुळे भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे.