आ. पृथ्वीराज चव्हाणांच्या माध्यमातून कराड दक्षिणेतील 22 किलोमीटर रस्त्यांना दर्जोन्नती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विकासाचे मार्ग भक्कम करणारे नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मतदारसंघातील २२ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांना दर्जोन्नती मिळाली आहे. आ. चव्हाण यांनी विकासाचे हे आणखी एक पाऊल उचलले असल्याने त्यांच्या कार्याबद्दल कौतुक होत आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र डेली होते. तसेच ग्रामीण मार्गांची दर्जोन्नती करण्याबाबतची मागणी पत्राद्वारे केली होती. त्यावेळेस त्यांनी मागणी केलेल्या रस्त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने राज्य शासनाने सादर केला होता. सदर प्रस्तावामध्ये मागणीकृत रस्त्यांकरिता भूसंपादनाची आवश्यकता नसल्याचे व सदरहू रस्ते वन जमिनीतून जात नसल्याचे नमूद केले आहे. तसेच आ. चव्हाण यांच्या मागणीवरून जिल्हा परिषदेने सदरच्या रस्त्यांची मागणी असणारा प्रस्ताव दाखल केला.

सदर रस्त्यावरील गावांची संख्या, रस्त्यांचा होणारा वापर तसेच जिल्हा परिषदेचा ठराव विचारात घेवून खालील ग्रामीण मार्ग रस्ते इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामध्ये धानाई मंदिर – गोपाळनगर – शिंदेवस्ती – मोळाचा ओढा – वडगाव हवेली – थोरातमळा व्हाया केळबावी (शेरे) हा ११ किलोमीटर व गणेशनगर – वडगाव हवेली ते राज्य मार्ग १४२ ते कार्वे शिव – थोरातमळा रस्ता हा ११ किलोमीटर रस्ता असे एकूण २२ किलोमीटर रस्त्याची दर्जोन्नती करण्यात आली आहे. या रस्त्यांमुळे शेतीतील वहिवाट आणखी सुखकर होणार आहे. या रस्त्यांमुळे कार्वे, वडगाव हवेली, शेरे या गावातील शेकडो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

कृष्णाकाठावरील गावातील ग्रामीण मार्गांची जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती

आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कृष्णाकाठी असलेल्या गावातील ग्रामीण मार्गांची इतर जिल्हा मार्ग म्हणून दर्जोन्नती केली आहे. याच अनुषंगाने आ. चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना या विभागात कार्वे नाका ते कार्वे चौकी या रस्त्याचे चौपदरीकरण केले. या कामामुळे गोळेश्वर व कार्वे येथील लोकांचा आर्थिक विकास झाला.