सातारा प्रतिनिधी । वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी पालघरहून एक पर्यटकांची बस वाईत आली होती. या बसमधील चालकाने बस पार्किंग करण्यासाठी रस्त्याकडेला उभी केली असता काही स्थानिकांनी अचानक दगडफेक केली. यामध्ये बसच्या काचा फुटल्या असून 3 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत.
जितेंद्र प्रभाकर तरे (वय 40), मोहन हरिचंद्र तरे (वय 62), प्रतीक दिलीप तरे (वय 21) अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहरेत. याबाबत अधिक माहिती अशी की, पालघर तालुक्यातील एडवन गावातील ग्रामस्थ आपल्या कुटुंबियांना सोबत घेऊन गेल्या १० वर्षापासून वाईचा गणपती व मांढरच्या काळुबाईच्या दर्शनासाठी येत असतात. शनिवारी, दि.१५ रोजी दुपारी हे पर्यटक वाईत आले होते. दुपारी वाईच्या महागणपतीच्या दर्शनासाठी (MH 04 GP 0876) या लक्झरी बसने पोचले.
दरम्यान, बसचा चालक गणपती पुलावर साईटला बस पार्क करत होता. त्यावेळी त्या ठिकाणी गुरेबाजार झोपडपट्टीतील मुलांबरोबर बस लावण्याच्या जागेवरून चालकाची किरकोळ बचावाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीची माहिती जवळच असलेल्या गुरेबाजार झोपडपट्टीत पसरली व तेथून महिला पुरुषांसह मोठ्या संख्येने जमाव या ठिकाणी आला आणि त्यांनी थेट बसवर दगडफेक करायला सुरुवात केली. यात बसच्या काचा फोडुन दगड बसमध्ये बसलेल्या पर्यटकांच्या डोक्यात आदळल्याने जितेंद्र प्रभाकर तरे (वय ४०), मोहन हरिचंद्र तरे (वय ६२), प्रतीक दिलीप तरे (वय २१) हे गंभीर जखमी झाले आहेत.
वाईत पर्यटकांच्या बसवर दगडफेक; 3 जण जखमी pic.twitter.com/Iy4ohwsS2g
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) July 16, 2023
जखमींना उपचारासाठी वाई पोलिसांनी वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर काही महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत. या घटनेची माहिती वाईच्या पोलिसांना लागताच सहाय्यक पोलिस निरिक्षक आशिष कांबळे, फौजदार सुधीर वाळुंज, श्रावण राठोड, प्रेमजीत शिर्के, उमेश गहीण व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळावर पोहचल्याने पुढील अनर्थ टळला. दरम्यान याबाबतची तक्रार वाई पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.