सातारा प्रतिनिधी । आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी भाजपकडून बैठका घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा हे आजपासून दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या या दौऱ्यात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक रात्री उशिरा घेणार आहेत. केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा यांचे आज बुधवारी दुपारी साडेचार वाजता खंडाळा येथे आगमन होईल. तेथील विकासकामांची ते पाहणी करतील. त्यानंतर पावणेसहा वाजता त्यांचे साताऱ्यात आगमन होईल. यावेळी ते विविध गणेश मंडळांना भेटी देणार आहेत, तसेच सायंकाळी साडेसहा वाजता शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधतील. त्यानंतर साडेसात ते रात्री नऊ यावेळेत ते विविध गणेशमंडळांना भेटी तसेच बुध कमिटी अध्यक्षांच्या मंडळांना भेटी देतील.
रात्री सव्वानऊ वाजता हॉटल फर्न येथे भाजपच्या कोअर कमिटी बैठकीस उपस्थित राहून सातारा लोकसभेचा आढावा घेतील. तेथेच मुक्कामी थांबतील. गुरुवारी (दि. २८ सकाळी ९ वाजता दत्ताजी थोरात यांच्या निवासस्थानी भेट देतील. त्यानंतर चार भिंती या ऐतिहासिक स्थळाला भेट देऊन माझी माती, माझा देश उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ देतील. सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृहात राखीव राहील. तेथून ते पुण्याकडे रवाना होतील.