सातारा प्रतिनिधी | दि. १६ सप्टेबर २०२४ रोजी ईद-ए-मिलाद व दिनांक १७ रोजी अनंत चतुर्थी आहे. त्यामुळे त्यादिवशी शासनाकडून मद्यपान बंदी दिवस (ड्राय-डे) घोषित करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली आहे.
प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, ईद आणि अनंत चतुर्थी साजरी करण्यास दोन्ही समाजातील समाज बांधव एकत्र येतात. येत्या १६ सप्टेबरला मोहंमद पैगंबर यांची जयंती आहे.
दि. १७ सप्टेंबरला अनंत चतुर्थी असल्याने आपल्याकडून मद्यपान बंदी दिवस घोषित करण्यात यावा. जेणे करुन दोन्ही सण उत्साहात जिल्हयात व राज्यात साजरे होतील तसे आपण जिल्हाधिकारी म्हणून खुप चांगल्या पद्धतीने जिल्हयात काम करीत आहात. या निर्णयामुळे आपली प्रतिमा समाजात उंचावेल व समाजाला जे अपेक्षित आहे ते आपल्याकडून काम होइल याची दक्षता घ्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष इम्रान मुल्ला यांनी केली आहे.