ग्रामपंचायतीमध्ये नलजल मित्रांची नियुक्ती; पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा उपक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | जल जीवन मिशन अंतर्गत ■ राज्यातील पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी, प्लंबर, मोटर मेकॅनिक, फिटर व इलेक्ट्रिशियन, पंप ऑपरेटर याप्रमाणे तीन नल-जल मित्रांची नेमणूक केली जाणार आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध होणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत – पाणीपुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती योग्यरीतीने होण्यासाठी प्रति ग्रामपंचायत ३ नल-जल मित्र यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यस्तरावर तिन्ही पदांकरता प्रत्येक पदासाठी तीन याप्रमाणे प्रति ग्रामपंचायत ९ उमेदवारांचे अर्ज ग्रामपंचायतीने अॅपवर भरायचे आहेत. राज्यस्तरावर ग्रामपंचायतीने भरलेल्या अर्जामधून उमेदवारांची निवड करून त्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्लम्बर-गवंडी, मोटर मेकॅनिक फिटर आणि इलेक्ट्रिशियन पंप ऑपरेटर या तीन ट्रेडसाठी गावातील अनुभव असलेल्या व आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. प्लम्बिंग, गवंडी, मोटर मेकॅनिक व इलेक्ट्रिशीयन ही कौशल्ये असलेल्या उमेदवारांना गावातच रोजगार उपलब्ध होणार आहे.

शासनाच्या या योजनेमुळे प्रति ग्रामपंचायत कौशल्य संचसाठी एक ट्रेडसाठी एक याप्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवारांची निवड होणार आहे. कुशल उमेदवारांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होणार आहे.

दरम्यान, जिल्ह्यात म्हाते बुद्रुक, ता. जावलीसह काही ग्रामपंचायतींमध्ये नल-जल मित्रांची नेमणूक केली असून त्यांच्याकडून पाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्तीची कामे केली जात आहेत.