कराड प्रतिनिधी । दोन वर्षासाठी हद्दपारिचा आदेश असताना देखील पार्ट घरी आल्या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी कराड तालुक्यातील पेरले येथील आकाश घरातून अटक केली. गणेश बाळासाहेब कांबळे (रा. पेरले, ता, कराड) असे अटक केलेल्या आआरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि 24 रोजी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला आरोपी गणेश बाळासाहेब कांबळे हा त्याच्या पेरले गावी आला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी उंब्रज पोलीस स्टेशनचे पोलिस अंमलदार हवालदार संजय धुमाळ कॉन्स्टेबल थोरात यांना त्याच्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. पोलिस अंमलदार धुमाळ यांनी दि. 24 रोजी पेरले तालुका कराड गावचे हद्दीत जाऊन गणेश बाळासाहेब कांबळे याची माहिती घेतली असता तो घरी असल्याची माहिती मिळाली. त्याला राहत्या घरी जागीच पकडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्याबाबत परवानगी आहे का? असे विचारले.
यावेळी त्याने मी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नाही असे सांगितले. त्यावेळी गणेश कांबळे यांनी पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडील हद्दपारच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याने त्याच्या विरुद्ध उंब्रज पोलिसांनी कारवाई केली आहे. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विवेक गोवारकर हवालदार संजय धुमाळ, कॉन्स्टेबल मयूर थोरात, श्रीधर माने, निलेश पवार यांनी केली आहे.