कराड प्रतिनिधी | महिलांचे गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास उंब्रज पोलीसांनी धडक कारवाई करीत अटक केली. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ८५ हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला.
संभाजी गोविंद जाधव (वय ३८, रा. सांगली रोड, चंद्रसेन नगरविटा ता. खानापूर जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळाली माहिती अशी की, दि. १७ /०३/२०२५ रोजी दुपारी २.०० वाजण्याच्या सुमारास उंब्रज ता. कराड गावचे हद्दीत गोडवाड़ी रोडने जात असताना एक अनोळखी मोटार सायकल वरील इसमाने फिर्यादी यांना दुचाकीवरून सोडण्याचा बहाण्याने मध्येच रोड़वर उतरवुन जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील १ तोळा वजनाचे सोन्याचे ६० हजार रुपये किंमतीचे मणिमंगळसूत्र नेले. यानंतर फिर्यादीने उंब्रज पोलीस ठाण्यात चोरट्याविरोधात फिर्याद दाखल केली.
फिर्याद दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कड़कर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांनी सहा. पोलीस निरीक्षक उंब्रज पोलीस स्टेशन श्री. रविंद्र भोरे यांना सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत मर्गदर्शन व सूचना दिल्या. त्यानुसार श्री. रविंद्र भोरे यांनी पोलीस स्टेशन मधील पोलीस अधिकारी व पोलीस औअंमलदार यांना उंब्रज पोलीसस्टेशन हद्दीमध्ये पेट्रोलींग करुन आरोपीचा शोध घेणे बाबत यांना सुचना दिल्या.
त्याप्रमाणे उंब्रज पोलीस स्टेशनमधील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे सदर आरोपीचा शोध घेत असताना मसुर फाटा पुढील हनुमानवाडी लगत असलेल्या वीट भट्टीजवळ एक इसम मोटर सायकल घेवून उभा असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी तात्काळ तेथे जाऊन इसमास मोटार सायकलसह संभाजी गोविंद जाधव (वय ३८, रा. सांगली रोड, चंद्रसेन नगरविटा ता. खानापूर जि. सातारा) याला ताब्यात घेतले.
तसेच सदर गुन्हा केल्याची कबूली दिली आहे. त्याचेकडे या गुन्द्यातील महिलेचे चोरी केलेले ०१ तोळा वजनाचे सोन्याचे मणीमंगळसुत्र असे ६० हजार रुपये किमतीचे मिळून आले तसेच त्यांचेकडे असलेली मोटर सायकल कराड येथील स्वामी समर्थ मंदिर येथून चोरी केत्याची कबूली दिली आहे. त्याचेकडून नमुद २५,०००/- रु. किमतीची मोटार सायकल असा एकूण ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल ठाकुर यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे,पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर, पो.ना. रोहित थोरवे, पो. कॉँ. मयूर थोरात, पो. कॉ. श्रीधर माने, पो. कॉ. निलेश पवार, पो.कॉ. मधकर मांडवे, पो. कॉ. राजकृमार कोळी, पो. कॉ, हेमंत पाटील यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास प्रभारीअधिकारी रविद्र भोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश ठाणेकर हे करीत आहेत.
कराडसह इतर ठिकाणी चोरी
अटक करण्यात आलेला चोरटा संभाजी जाधव यांच्याकडे पोलीसांनी अधिक चौकशी केली असता त्याचेवर विटा येथे गुन्हे दाखल असून स्थानिक पोलीस ओळखत असलेने त्याने कराड शहर परिसरात येऊन यापुर्वी कराड शहर, मलकापूर, विंग, विद्यानगर, या भागात तसेच औंध या ठिकाणी दुकाचीवरुन आपला चेहरा ओळखू नये म्हणून हेल्मेट घालून निर्जन स्थळी महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याचे ०८ प्रकार केले आहेत. त्याचेकडून मोटार सायकलवरुन येऊन महिलांचे गळ्यातील सोन्याचे किमती दागिने जबरीने हिसकावून नेल्याचे पुढील प्रमाणे एकूण ०८ गुन्हे उघडकीस आले.