शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून जिल्ह्यात आजपासून अनोखं अभियान सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्यावतीने जिल्ह्यात आजपासून दि. 1 जानेवारी पासून जनसंपर्क अभियान राबवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर चर्चा आणि राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यात येईल, अशी माहिती माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात बर्गे यांनी म्हटले आहे की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा लोकसभा मतदारसंघात आज दि. 1 जानेवारीपासून जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. दुष्काळाच्या झळा बसलेल्या शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर थेट त्यांच्या बांधावर जाऊन चर्चा केली जात आहे. साखर कारखानदारांकडून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे.

खतांचे वाढते दर पाहता उसाला प्रतिटन किमान साडेतीन हजार रुपये दर देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा पंचनामा या अभियानात केला जाणार आहे. कोरेगाव तालुक्याचा पूर्व भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी देखील बर्गे यांनी केली आहे.