उदयनराजे भोसले आज भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना झाले आहेत. यावेळी गांधी मैदानावरून महारॅली काढण्यात येत असून या महा रॅलीस सुरुवात झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) हे देखील उपस्थित राहणार आहेत

खासदार उदयनराजे भोसले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच्या महारॅली दुपारी १२ वाजल्यानंतर गांधी मैदान येथून सुरूवात झाली आहे. गोलबाग-मोती चौक-देवी चौक-कमानी हौद-शेटे चौक, पोलिस मुख्यालय, गीते बिल्डिंग, शिवतिर्थ पोवई नाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे या महारॅलीची सांगता होणार आहे.

या महारॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, (Ajit Pawar) पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवेंद्रराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, भाजपचे लोकसभा समन्वयक अतुल भोसले, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थिती राहणार आहेत.