सातारा प्रतिनिधी | खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभेच्या आखाड्यात अत्यंत रोमांचक विजय मिळवून सातारा जिल्ह्यात प्रथमच भाजपचे कमळ फुलवले आहे. मतदारांनी केलेल्या सहकार्याचे भान ठेवून आणि त्यांचे आभार मानण्यासाठी उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्ह्यात 21 व 22 जून रोजी आभार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दिनांक 21 जून रोजी सकाळी अकरा वाजता अमितराज मंगल कार्यालय कोरेगाव येथे आमदार महेश शिंदे, डॉ. प्रियाताई शिंदे, डॉ. अरुणा ताई बर्गे, शिवाजीराव महाडिक, सुनील खत्री, जयवंत पवार यांच्या उपस्थितीत महायुतीचा आभार मेळावा होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी सहा वाजता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील मसूर येथील अश्वमेध मंगल कार्यालयात आभार मेळावा होणार आहे. या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष धैर्यशीलदादा कदम, कराड उत्तर विधानसभा निवडणूक प्रमुख मनोजदादा घोरपडे, रामकृष्ण वेताळ, चित्रलेखा माने कदम, कुलदीप क्षीरसागर, संपतराव माने, वासुदेव माने, भीमरावकाका पाटील, शंकर शेजवळ, शेतकरी संघटनेचे सचिन नलावडे, जितेंद्र डुबल, मनसेचे विकास पवार आदी उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दिनांक 22 जून रोजी दुपारी एक वाजता मरळी तालुका पाटण येथील स्वर्गीय बाळासाहेब देसाई शताब्दी सभागृहात आभार मेळावा होणार आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, रविराज देसाई, यशराज देसाई, माजी आमदार नरेंद्र पाटील, भारतीय जनता पार्टीचे भरतनाना पाटील, विक्रम बाबा पाटणकर, भाजपा महिला आघाडीच्या प्रमुख कविता कचरे, संजय देसाई इत्यादी उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी सहा वाजता कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मतदारांच्या आभार प्रदर्शनाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला सातारा लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसले, विनायक भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड दक्षिण शिवसेना नेते राजेंद्र यादव, धनाजी पाटील, राजेश पाटील, विष्णू जाधव उपस्थित राहणार आहेत. कराड व कोरेगाव या तालुक्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजप सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी केले आहे.