उदयनराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट; मराठा आरक्षणासंदर्भात केली ‘ही’ महत्वाची चर्चा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा परतिनिधी । साताऱ्याचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी नवी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी मराठा आरक्षणसंदर्भात चर्चा केली व जातीनिहाय जनगणना करावी, अशी महत्वाची मागणी केली आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी देखील संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आरक्षणासंदर्भात विचार विनिमयाच्या चर्चेच्या माध्यमातून मार्ग निघू शकतो. देशाच्या घटनेपलीकडे जाऊन आरक्षण देता येत नाही. त्यासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, मनोज जरांगे पाटील, प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव प्रत्येकजण घेत असतो. पण आज विविध जाती तेढ निर्माण झाली आहे. मुळात जातीनिहाय जनगणना होणे गरजेचे आहे. त्यातून कोणत्या जातीची लोकसंख्या किती त्यानुसार आरक्षण देता येईल. आज जी परिस्थिती पहायला मिळतेय त्यात खास करुन राज्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar, जरांगे-पाटील, लक्ष्मण हाके असतील या लोकांनी राजकारण करु नये. त्यापेक्षा एकत्रित येऊन मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक करावी व मार्ग काढावा. त्यातून कोण राजकारण करतेय आणि कोण नाही, हे लोकांना कळेल, असे देखील खा. उदयनराजे यांनी म्हटले.