सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा महाराष्ट्र शासनाच्या 2024-25 या वर्षाचा वतीने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” कोल्हापूर विभागात विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. या जिल्हा परिषदेच्या शाळेने मिळवलेल्या यशाचे भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी कौतुक केलं आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकतीच फेसबुक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी शाळेतीळ विद्यार्थी आणि शिक्षक तसेच त्यासाठी परिश्रम घेतलेल्या व्यक्तींचे अभिनंदन केले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, ‘आमच्या सातारा जिल्ह्या बरोबरच संपूर्ण हिंदुस्थानचा अभिमान असलेले सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिलिटरी) या गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचा महाराष्ट्र शासनाच्या 2024-25 या वर्षाचा वतीने “मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” कोल्हापूर विभागात विभागीय पातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी श्री जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) शबनम मुजावर, गट शिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मंगल जगताप, शिक्षक वृंद, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री किशोर मोरे व सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि हितचिंतक यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.