उदयनराजेंनी घेतली रामराजेंची भेट; बंद दाराआड सुमारे अर्धा तासांत नेमकं काय घडलं?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्हीही उमेदवारांकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. प्रचारादरम्यान, त्यांच्या कडून अनेकांच्या भेटीगाठी देखील घेतल्या जात आहेत. दरम्यान, आज महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी फलटणचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांची आज साताऱ्यातील प्रिती हॉटेलमध्ये भेट घेतली. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या उपस्थितीत दोघांच्यात सुमारे अर्धा तास चर्चा झाली. दोघांच्या भेटीची चांगलीच चर्चा सध्या जिल्हाभर सुरु झाली आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या भाजपचे खासदार उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात प्रतिष्ठेची लढत होत असली तरी दोघांपौधे एकमेकांचे चांगलेच आव्हान आहे. लोकसभेच्या या निवडणुकिट दोघांपैकी एकाची राजकीय कारकिर्द धोक्यात येणार हे नक्की. कमी कालावधी उरला असल्याने दोघांनीही प्रत्यक्ष गाठीभेटीवर जोर दिला आहे. सातारची जागा हि भाजपाकडे गेल्यामुळे सुरुवातीला अजित पवार गटात नाराजीचा सुरु उमटल्याचे दिसून आले. मात्र, आता प्रत्यक्षात वेगळ्याच घडामोडी घडत आहेत.

भेटीवेळी नेमकं काय घडलं?

रामराजे व उदयनराजेंच्या या भेटीमुळे या निवडणुकीत सातारा लोकसभा मतदारसंघातील रामराजेंचा गट हा उदयनराजेंसोबतच राहणार हे निश्चित मानले जात आहे. आज खासदार उदयनराजे भोसले यांची हॉटेल प्रिती येथे विधानपरिषदेचे माजी सभापती व अजित पवार यांच्या गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासोबत भेट झाली. दोघांनीही एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

उदयनराजे व रामराजेंच्या भेटीवेळी कोण उपस्थित होते?

उदयनराजे भोसले यांनी जेव्हा रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली त्यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, सुनील काटकर, मनोज घोरपडे, वसंतराव मानकुमरे उपस्थित होते. आज दुपारी या दोघांनी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या दालनात सुमारे अर्धातास चर्चा केली. यावेळी बंद दाराआड झालेल्या चर्चेवेळी प्रभाकर घार्गे व मनोज घोरपडे हे दोघेच उपस्थित होते.