सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूकीची रणधुमाळी संपल्यानंतर तसेच मतदान झाले आहे. त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले आज शनिवारी बीड येथे पंकजा मुंडेंसाठी आयोजित केलेल्या सभेसाठी साताऱ्यातून विशेष हेलिकॉप्टरने रवाना झाले आहेत.
सातारा लोकसभेसाठी 7 मे रोजी मतदान झाले. आता तब्बल 24 दिवस निकालाची प्रतीक्षा आहे. मतदानानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी दोन, चार दिवस विश्रांती घेतली. आता मराठवाड्यात चौथ्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामध्ये बीडच्या भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारार्थ बीडला आज कृषी मंत्री धनंजय मुंडे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत परळी वैद्यनाथ येथील मोंढा मैदानावर दुपारी तीन वाजता जाहीर सभा होणार आहे.
या सभेसाठी स्टार प्रचारक म्हणून उदयनराजे भोसले हे बीडमध्ये दाखल झाले आहेत. विशेष हेलिकॉप्टरने खासदार उदयनराजे भोसले हे आज दुपारी साताऱ्यातून बीडमध्ये आले आहेत. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून भाजपच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली आहे. तेथील मतदानानंतर उदयनराजे हे बीडमध्ये आले आहेत.