सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि आघाडीत जागा वाटपांचा घोळ सुरूच असल्याने सातारा जिल्ह्यातील तिढ्यांच्या जागांचा फैसला झालेला नाही. त्यामुळे इच्छुकांची घालमेल सुरू आहे. दोन दिवसात हा घोळ संपवावा लागणाार आहे. तरच सोमवारी-मंगळवारी अर्ज भरता येणार आहे. तर दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांची निवड या दरम्यान, भाजपने (BJP) देखील पक्षातील साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraj Bhosale) यांची स्टार प्रचारक म्हणून निवड केली आहे.
राज्यात विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात होत असून ऐन दिवाळीत आता एकमेकांविरोधात फटाके फुटणार आहेत. नुकतीच भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह ४० जणांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी अनेक पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात केंद्रीय नेत्यांसह राज्यातील नेत्यांचा समावेश आहे. एकूण ४० जणांची मोठी असून त्यात केंद्रातील २० व राज्यातील २० नेत्यांचा समावेश आहे.
जिल्ह्यात राज्यासाठी स्टार प्रचाराची धुरा खा. श्री. छ. उदयनराजे भोसले सांभाळणार आहेत. या यादीत देवेंद्र फडणवीस, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण, नारायण राणे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे- पाटील, गिरीश महाजन, रविंद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, अमर साबळे, मुरलीधर मोहळ, अशोक नेते, डॉ. संजय कुटे, नवनीत राणा यांचा समावेश आहे.