सातारा प्रतिनिधी । आज भाजपचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे. “पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी व आयआयटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी तीन वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. मात्र, त्यांनी कोणत्याही प्रोजेक्टवर सह्या केल्या नाहीत. का, त्यांना सह्या करता येत नाहीत का?”, अशी घणाघाती टीका उदयनराजे यांनी चव्हाण यांच्यावर केली.
साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्याकडून प्रचाराचा धडाका लावला जात आहे. दरम्यान, आज एका प्रचारसभाईत त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा यांच्यावर निशाना साधला. ते म्हणाले की, “पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस साताऱ्यामध्ये कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी व आयआयटीचे वेगवेगळे प्रोजेक्ट निर्मिती करण्यासाठी तीन वेळा त्यांच्याकडे हेलपाटे मारले. मुख्यमंत्री असतानाच त्यांनी जिल्ह्याचा विकास राखडवला आहे.
जिल्ह्याच्या विकासासाठी जो निर्णय घ्यायचा आहे तो आम्ही घेऊ. बाहेरच्या जिल्ह्यातून लोकांनी येऊन आपल्याला सांगायचं नाही, की आमच्या जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे. आधी स्वत:चा जिल्हा बदला नंतर दुसऱ्याच्या जिल्ह्याकडे बघावे, असा टोला उदयनराजे यांनी शरद पवार यांना लगावला.