सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Satara Lok Sabha 2024 Result) मतमोजणीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून आघाडीवर असलेले महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे आता पिछाडीवर गेले आहेत. तर महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे वेगाने मतांचा आकडा घेत आघाडीवर आले आहेत. मताची आकडेवारी वाडु लागल्याने त्यांच्या जलमंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याचे पाहिल्यानंतर उदयनराजेंचे अश्रू अनावर झाले. उदयनराजे भोसले पहिल्या फेरीपासून पिछाडीवर होते आता ते पुन्हा आघाडीवर येऊ लागल्याने शिंदेंचे टेन्शन वाढू लागले आहे. शशिकांत शिंदे यांना आतापर्यंत 2 लाख 68 हजार 473 मते मिळाली आहेत. तर उदयनराजे भोसले यांना 2 लाख 63 हजार 190 मते पडली आहेत.
सातारा लोकसभेसाठी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह १६ उमेदवार रिंगणात होते. खरी लढत ही भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांच्यातच झाली. या दोघांनी मतदारसंघात प्रचाराचे रान उठवले होते. भाजपला याठिकाणी सुरुवातीला धक्का बसला होता. २३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून, दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिंदेच्या विजयी जल्लोषानंतर निकाल लागला फिरू
सातारा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा मतांचा एकदा वाढत चालला होता. त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाच्या भरात शिंदेंना खांद्यावर घेत त्यांची चक्क मिरवणूकच काढली. मात्र, आता प्रत्यक्षात उद्यनराजे मदाधिक्य घेऊ लागले असल्याने शिंदेंचे टेन्शन वाढू लागले आहे. त्यांनी साताऱ्यात येण्याऐवजी घरातच राहणे पसंद केले आहे.
सातारा लोकसभेतील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची आकडेवारी
कोरेगाव : 2 लाख 11 हजार 680 मतदान, 67.59 टक्के
कराड उत्तर : 1 लाख 94 हजार 29 मतदान, 65.34 टक्के
कराड दक्षिण : 1 लाख 98 हजार 633 मतदान, 65.65 टक्के
पाटण : 1 लाख 70 हजार 616 मतदान, 56.95 टक्के
सातारा : 2 लाख 10 हजार 656 मतदान, 62.74 टक्के
वाई : 2 लाख 7 हजार 878 मतदारांनी मतदान, 60.83