40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटणार! कास-सातारा पाइपलाईन कामाबाबत उदयनराजेंचं परिपत्रक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | केंद्रशासनामार्फत अमृत योजनेमधून 102.56 कोटी रुपयांचा अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. कास ते सातारा नवीन अतिरिक्त पाईपलाईनचे काम सातारकर यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि मैलाचा दगड ठरणारे काम आहे. हे महत्वपूर्ण काम पूर्णत्वाकडे जात असल्याने, पुढील सुमारे 40 वर्षांची सातारकरांची चिंता मिटली असल्याची माहिती भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

खा. उदयनराजे यांनी पत्रकात म्हंटले आहे की, कास धरणाची उंची वाढवल्याने धरणातील पाण्याचा साठा पुर्वीपेक्षा पाचपटीने वाढला आहे. वाढीव साठयाचा उपयोग होण्यासाठी, केंद्रशासनामार्फत अमृत योजनेमधून 102.56 कोटी रुपयांचा अतिरिक्त नवीन एम.एस.पाईपलाईनचा प्रकल्प मंजूर करुन घेण्यात आला आहे. कास धरण ते सातारा अशी सुमारे 27 किलोमीटर लांबीच्या नवीन अतिरिक्‍त पाईपलाईनच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या एम.एस.पाईपलाईनचे मोठे ट्रक सातारा- कास परिसरात दाखल झाले आहेत.

साताऱ्याचे प्रथम लोकनियुक्‍त नगराध्यक्ष (कै.) प्रतापसिंह उर्फ दादा महाराज यांनी सन 1975-76 साली, कास ते सातारा अशी बंदिस्त पाईपलाईन टाकण्याचे प्रस्तावित केले होते. आमच्या आणि सातारकरांच्या दुर्देवाने दादामहाराज यांचा अकाली मृत्यू ओढवला. पुढे जवळजवळ 22- 23 वर्षे बंदिस्त पाईपलाईनचे काम झाले नाही.

आम्ही कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यावर, या कामाला गती दिली आणि महसूल राज्यमंत्री झाल्यावर, उघडया पाटाने येणाऱ्या पाण्याऐवजी सांबरवाडी फिल्टरेशन प्लॅंटपर्यंत अधिक स्वच्छ पाणीपुरवठा बंदिस्त पाईपलाईने होवू लागला. बंदिस्त पाईप झाल्यामुळे पाणी मुरुन (परक्‍युलेश) वाया जाण्याचे प्रमाणही अत्यल्प झाले. त्यानंतर सातारकरांची तहान भागवणाऱ्या कास धरणाची नुकतीच उंची वाढवण्यात आली. यासाठी 95 कोटी रुपये विनियोगात आले आहेत. उंची वाढवल्याने भविष्यातील 35-40 वर्षे सातारकरांना बिनखर्चाचा ग्रॅव्हीटीने मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. उंची वाढवल्याने पूर्वीची 0.1 टिएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आज रोजी 0.5 टिएमसी क्षमतेचे झाले आहे. पाणीसाठा सुमारे 5 पटीने वाढला आहे.