सातारा प्रतिनिधी । पहिला मानाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार’ आणि ‘शिवसन्मान पत्र’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित करण्यात आला आहे. साताऱ्यात दि. 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयात बैंठकीस उपस्थित राहून आढावा घेतला होता. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा सोहळ्याच्या कार्यक्र्मस्थळास भेट देत पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिसप्रमुख समीर शेख, सैनिक स्कूलचे प्राचार्य, अधिक्षक, नगरपरिषदेचे सीओ श्री. अभिजीत बापट, विविध विभागांचे विभागप्रमुख, श्री सुनील काटकर, श्री संग्राम बर्गे, श्री पंकज चव्हाण, श्री मनोज शेंडे, श्री चंद्रकांत पाटील व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी खा. उदयनराजे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्थेबरोबरच तेथील नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देखील केल्या.