आहो मास्तर, पोरगं नापास झालं..आता काय करायचं! उदयनराजेंनी केली निळू फुलेंची मिमिक्री, पाहा व्हिडिओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । भाजप खासदार उदयनराजे भोसले नेहमीच आपल्या डायलॉग आणि स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची प्रचंड क्रेझ आहे. उदयनराजे स्टेजवर आले की टाळ्या आणि शिट्ट्या थांबतच नाहीत. कधी ते बाईक राईड मारतात, तर कधी जीप्सी राईड. त्यांच्या कॉलर उडवण्याची स्टाईल तर फारच प्रसिद्ध आहे. दिलखुलास अंदाज आणि डायलॉगवर तरूणाई फिदा असते. ‘एक बार जो मैने कमेंटमेंट कर दी, तो मै अपनी खुद की भी नही सुनता’, हा डायलॉग तर सलमानच्या डायलॉगपेक्षाही जास्त गाजला. आता उदयनराजेंनी चक्क निळू फुलेंचीच मिमिक्री करत धमाल उडवली आहे.

लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उदयनराजेंनी विधानसभा मतदारसंघ निहाय आभार दौरा केला. कराड तालुक्यातील नारायणवाडी येथे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विजयी आभार मेळाव्यात त्यांनी निळू फुले यांची मिमिक्री करत उपस्थितांना पोट धरून हसायला लावले. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

यावेळी भाजपचे नेते अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, माजी आमदार आनंदराव पाटील, सुनील काटकर, संग्राम बर्गे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, विक्रम पावसकर, कृष्णेचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, प्रा. मच्छिंद्र सकटे, माजी नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सुहास जगताप, कराड दक्षिण भाजपचे अध्यक्ष पैलवान धनाजी पाटील, कराड शहरचे अध्यक्ष एकनाथ बागडी, अॅड. विकास पवार, दादासाहेब शिंगण उपस्थित होते.

उदयनराजे नेमकं काय म्हणाले ?

यावेळी निळू फुले यांच्या चित्रपटातील डायलॉग उदयनराजेंनी निळू फुले यांच्याच आवाजात सादर केला. चित्रपटात मुलाला शून्य मार्क भेटल्याने निळू फुले मास्तरांना भेटतात. ते म्हणतात, मास्तर पोरगं नापास कसं झालं? मास्तर सांगतात, परीक्षेला बसला नाही म्हणून शून्य मार्क मिळाले. निळू फुले म्हणतात, अहो मास्तर दोन शून्यांच्या पुढे एक लावा की… म्हणजे पैकीच्या पैकी मार्क पडतील. या निळू फुले यांच्या आवाजातील उदयनराजेंच्या डायलॉगला टाळ्या आणि शिट्ट्या मिळाल्या.