देवेंद्रजी यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात, त्यांच्या पाठिशी उभं राहायला पाहिजे – उदयनराजे भोसले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । कराड-उत्तरचे भाजप उमेदवार मनोज घोरपडे यांच्या प्रचारार्थ कराड तालुक्यातील पाल येथे आज जाहीर सभा पडली. यावेळी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत महत्वाचे विधान केले. “देवेंद्रजी एवढं काम करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण त्यांच्या पाठिशी उभं राहिलं पाहिजे. आपण त्यांच्या पाठिशी उभं नाही, राहायचं तर कोणाच्या पाठिशी उभं राहायचं?” असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

कराड तालुक्यातील पाल येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम उपस्थित होते. यावेळी खा. उदयराजे भोसले म्हणाले, महायुतीची प्रगती सुरु आहे. चांगल्या योजना राबवल्या आहेत. जो काम करतो त्याला ठेस लागते. हे लोक फक्त नाकार्तेपणा लपवण्यासाठी चिखल फेक करतात, व्यक्ती दोषावर बोलतात. देवेंद्र फडणवीस एवढं काम करत असताना त्यांना धमक्या मिळतात. जीवे मारण्याच्या धमक्या येतात. आपण यांच्या पाठीशी उभे रहायचे नाही तर कोणाच्या समोर उभे रहायचे?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपण नुसतं विकास करुन थांबलो नाही, तर शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारने शेतकऱ्यांचे बिल भरणयाचा निर्णय घेतला. आता शून्य बिल येते. सौर उर्जाही सुरु केली आहे. चोविस तास वीज देणार आहोत. रात्री शेतकऱ्यांना जायची गरज लागणार नाही. शेतकऱ्यांचा टॅक्स माफ केला. अमित शाह यांनी 10 हजार कोटी रुपयांचा इनकमटॅक्स रद्द केला. सरकार आले तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

तुमचा विश्वास आम्ही कधीही ढळू देणार नाही : धैर्यशील कदम

कराड उत्तर विधानसभा मतदार संघात चार तालुक्याचा समावेश होतो. कराड, सातारा, कोरेगाव आणि खटाव होय. प्रत्येक तालुक्याची जडण घडण वेगळी आहे. या मतदार संघाची निर्मिती २००९ मध्ये झाली आहे. या मतदार संघात पर्त्येकवेळा मतांची विभागणी झाली. त्यामुळे या ठिकाणी नाकारता आणि बिनकामाचा आमदार गेली २५ वर्षे सतत निवडणूक येत राहिला. पण यावेळी तसे नाहीय. ज्या विश्वासाने आम्हाला तुम्ही थांबायला सांगून काम करायला लावलं आहे. तुमचा विश्वास आम्ही कधीही ढळू देणार नाही. सातारा जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून जेवढी ताकद कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कमळ देण्यासाठी लावली. आणि त्या चर्चेचे आणि ताकदीचे खरोखर आपल्यावर उपकार केले देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर केले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी म्हटले.

लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर 2100 देणार

आमच्या बहिणी आता बाहेर पडल्या आहेत. सर्व शिक्षणाची फी राज्य सरकार भरत आहे. मुलीचे मामा मंत्रालयात बसलेत. मुलींच शिक्षण मोफत केले. लाडकी बहीण योजना सुरु केली. 1500 द्यायला सुरवात केली. नौटंकी बाज बोलायला लागले योजना बंद होईल. आम्ही लाडके भाऊ आहोत तसे ते सावत्र भाऊ आहेत, ते कोर्टात गेले. काळजी करु नका तुमचे सख्खे भाऊ बसलेत. ही योजना भविष्यातही सुरुच राहणार आहेत. आता 1500 नाही तर 2100 देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी कालच सांगितले आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.