सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सातारा लोकसभा निवडणुकीत माथाडी नेते शशिकांत शिंदे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही महायुतीकडून उदयनराजे भोसले यांची उमेदवारी अजूनही जाहीर करण्यात आलेले नसली तरी उदयनराजेंनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, आज उदयनराजेंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साताऱ्यातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे महत्वाची विनंती देखील केली.
भाजप नेते उदयनराजे भोसले यांच्याकडून सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटीगाठी दिल्या जात आहे. दरम्यान, त्यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी त्यांनी माध्यमांशी देखील संवाद साधंला. ते पुढे म्हणाले की, काहीवेळा महापुरुषांवर काहींकडून वादग्रस्त विधाने केली जातात. अशा वादग्रस्त विधाने करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेची आहे.
महापुरुषांविरोधात वादग्रस्त विधाने करणाऱ्यावर केंद्र आणि राज्य सरकारने देशद्रोहाचा कायदा लावावा. दोन्ही सरकारने महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्यावर कठोरातील कठोर कारवाई हि करावी, अशी मागणी मी यानिमित्ताने करत असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हंटले.