सातारा प्रतिनिधी | सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीसह घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी खासदार उदयनराजे भोसले हे बैठकीच्या ठिकाणी शेतकऱ्याच्या वेशात आले होते; पण बैठकीस येण्यास पदाधिकाऱ्यांना उशीर झाल्याने खासदार थोडावेळ थांबून बाहेर पडले. ”माझा लुक चांगला असल्याने निदान डोळा तरी मारा; पण मी डोळा मारला तर त्याचा वेगळा अर्थ घेतला जाईल,” ”जो ताण घेतो त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्याला रक्तदाबाचा त्रास सुरू होतो.” असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर दिले.
महायुतीतील घटक पक्षांची महत्त्वपूर्ण बैठक काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भेासले, महेश शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, डॉ. अतुल भोसले, मनोज घोरपडे, अमित कदम, विक्रमबाबा पाटणकर, चंद्रकांत पाटील, सुरभी भोसले, शारदा जाधव, अशोक गायकवाड, सुनील काटकर, पंकज चव्हाण, काका धुमाळ, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला उच्चांकी मतांनी निवडून दिले जाईल. त्यासाठी जिल्ह्यात सातारा, कराड, वाई येथे घटक पक्षांचे कार्यकर्ते मेळावे घेतले जाणार आहेत.