सातारा प्रतिनिधी । सातारा नगरपरिषदेसाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन सातारा शहराचा समतोल सर्वंकष विकास साधत विविधांगी सेवा-सुविधा सातारकरांना पुरवण्यावर सातारा विकास आघाडीचा भर राहीला आहे. त्यानुसार जिल्हा नियोजन समितीमधुन एकूण 19 अशा सुमारे 14 कोटी 65 लाख रुपयांच्या विकास कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असल्याची माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. .
सातारा नगरपरिषदेची प्रशासकीय इमारत, विविध भागातील रस्ते, नवीन कास पाईपलाईन, कास धरण, भुयारी गटर योजना, ग्रेडसेपरेटर, कचरा संकलनाकरीता 14 वा वित्त आयोगातुन रक्कम उभी करणे, स्पर्धात्मक उपक्रमामधुन प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग अश्या अनेक शासन योजनामधुन, लोकोपयोगी कामे आणि सातारकरांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न राहीला आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा प्रशासन अधिकारी यांना लोकोपयोगी काम सुचवून, त्यांच्या माध्यमातुन महाराष्ट्र नगरोथ्थान महा अभियानांतर्गत, भांडवली मत्तेच्या निर्मितीकरीता असलेल्या योजनेमधुन सातारा नगरपरिषदेच्या हद्दीतील एकूण 19 कामे सर्वसाधारण वार्षिक योजनेमध्ये सुचवण्यात आली होती. या कामांना प्रशासकीय मंजूरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना असल्याने या 19 कामांना तांत्रिक मान्यता मिळवून, रुपये सुमारे 14 कोटी 65 लाख इतक्या रक्कमेच्या कामांना, प्रशासकीय मान्यता मिळण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सदरचा प्रस्ताव मंजूर करण्याबाबत आम्ही व्यक्तीश: जिल्हाधिकारी श्री. जितेंद्रसिंह डूडी यांना विनंती सूचना केली होती. त्यानुसार खालील कामांना प्रशासकीय मंजूरी मिळाली असून, निधी देखिल प्राप्त झाला आहे. या 14 कोटी 65 लाख रुपयांच्या कामांकरीता कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी असणार आहेत. वरील काम लवकरच सुरु होण्याबाबतची योग्य ती कार्यवाही जिल्हाप्रशासन अधिकारी, सातारा तथा मुख्याधिकारी, सातारा नगरपरिषद यांच्या माध्यमातुन करण्यात येईल. कामे मंजूर करण्याबाबत जसा पाठपुरावा सातारा विकास आघाडीने केला असल्याचे खा. भोसले यांनी म्हटले आहे.