सातारचे दोन्ही ‘बिग बॉस’ जलमंदिर पॅलेसमध्ये एकत्र; उदयनराजे अन् शिवेंद्रराजेंचं झापूक झुपुक…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | गेल्या अनेक वर्षांपासून सातारच्या राजकारणात आमने-सामने असणारे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले काल एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. आमदार शिवेंद्रराजे यांनी प्रथमच उदयनराजेंची जलमंदिर पॅलेसमध्ये जाऊन भेट घेतली. काहीवेळ चर्चा झाल्यानंतर शिवेंद्रराजे गाडीत बसलेले असताना उदयनराजेंनी हातात गाडीचे स्टेअरिंग घेतले होते. यावेळी शिवेंद्रराजेंनी बिग बॉसमधील झापुक झुपुक गाणे लावले. गाणे वाजताच उदयनराजे दिलखुलासपणे हसल्याचे पहायला मिळाले.

सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजारी असल्यामुळे त्यांना पाहण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले हे सुरुची बंगला येथे गेले होते. मात्र त्यांची आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट न झाल्याने आज शिवेंद्रसिंहराजे भोसले आपल्या थोरल्या बंधूराजांना भेटण्यासाठी जलमंदिर पॅलेस मध्ये गेले होते. या वेळेला तब्येतीची विचारपूस तर झालीच त्याच बरोबरच दोन्ही राजे बंधू मध्ये राजकीय चर्चा देखील झाली.

कित्येक वर्षांपासून दोन्ही राजांच्यात असलेलं वैरत्व सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे एकमेकांच्या बंगल्यावर जाणे- येणे या दोन्ही राजेंचे बंद होते. मात्र लोकसभेच्या निवडणुकीपासून दोन्ही राज्यांचे मनोमिलन झाल्याने हे आता दोन्ही राजे एकमेकांच्या घरात येऊ लागले आहेत. त्यामुळेच अनेक वर्षानंतर शिवेंद्रसिंहराजे भोसले देखील जलमंदिर पॅलेस मध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे.