भर दुपारी गोळीबाराने सातारा हादरला; दोघांना जखमी करून हल्लेखोर पसार

0
3727
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी भरदिवसा केलेल्या गोळीबारात दोन तरूण जखमी झाल्याची घटना सातारा तालुक्यातील कोंडवे येथे घडली. पायात गोळी घुसल्याने तरूण गंभीररित्या जखमी झाला असून दुसरी गोळी एका तरूणाला चाटून गेली आहे या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. साताऱ्यात भरदिवसा करण्यात आलेल्या गोळीबारात दोन तरूण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली.

अमर गणेश पवार आणि श्रेयस सुधीर भोसले, अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, साताऱ्यातील कोंडवे गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या परिसरात गोळीबार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. यावेळी गोळीबारात दोघेजण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच सातारा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गोळीबारात अमर पवार याच्या पायात गोळी घुसली असून दुसरी गोळी श्रेयस भोसले याला चाटून गेली आहे.

दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलीस यायू घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत. कोंडवे हद्दीतील गोळीबाराची घटना नजीकच्या पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तपासासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलं आहे. त्याआधारे संशयितांची ओळख पटविण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, पोलीस तपास सुरू असून हल्ल्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.