भर दिवसा महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट एकमेकांना भिडले; चौघेजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा येथे काही महिन्यापूर्वी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीची घटना घडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. साताऱ्यातील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट समोरासमोर आले. त्यांनी एकमेकांना मारण्यास सुरुवात केली जवळपास अर्धातास मारामारीच्या हा प्रकार चालला. यानंतर सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ४ तरुणांना ताब्यात घेतले. हा प्रकार बुधवारी दुपारी दीड वाजता घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, साताऱ्यातील जिल्हा न्यायालयाच्या मुख्य रस्त्यावर महाविद्यालयीन तरुणांचे दोन गट समोरासमोर आले. तसेच त्यांनी एकमेकांना मारायला सुरुवात केली. घडलं असं की, महाविद्यालय सुटल्यानंतर काही मुले चालत सहकार न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरून जात होती. त्यावेळी काही तरुण पाठीमागून आली. त्यांनी पुढे गेलेल्या मुलांवर अचानक हल्ला केला. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांना भिडले.

तरुणांच्या दोन्ही गटाचा भर रस्त्यातच मारामारीचा प्रकार सुरू होता. काहींनीत्यांच्या मारामारीच्या व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या वादावादीची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिस आल्याचे समजताच काही तरुण पसार झाले तर चार तरुणांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यानंतर त्यांची पोलिसांकडून कसून चाैकशी सुरू होती. कोणत्या कारणातून हा वाद झाला, हे अद्याप समोर आले नाही.