दिवंगत रामराव निकम यांच्या 20 व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोलीत 2 दिवसीय विविध कार्यक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । इंदोली, ता. कराड येथील श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक दिवंगत रामराव निकम यांच्या २० व्या पुण्यस्मरणानिमित्त इंदोली येथे उद्या रविवारी व सोमवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि. कॉलेज इंदोली येथे आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य व्ही. एस. घाडगे यांनी केले आहे.

इंदोली, ता. कराड येथील श्री नृसिंह शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्यावरतीने दिवंगत रामराव निकम यांच्या 20 व्या पुण्यस्मरणानिमित्त उद्या रविवारी सकाळी ९ वाजता प्रसिद्ध वक्ते प्रा. युवराज पाटील हे ‘उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक वसंतराव रघुनाथ जंगम असणार आहेत. तसेच यावेळी रयत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद‌यसिंह पाटील उंडाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्यानंतर दुपारी २ ते ५ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

सोमवार, दि. १८ रोजी सकाळी ९ वाजता दिवंगत रामराव निकम शिक्षणशाख (बी.एड) कॉलेजचे प्रा. सचिन शिवाजीराव पाटील हे ‘आयुष्यावर बोलू काही’ या विषयावर मागदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक विक्रम शंकरराव निकम (बाबा) उपस्थित राहणार आहेत. यानंतर दुपारी २ ते ५ सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.