कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. पहिल्या दोन दिवसांत अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमी होती. पण, गुरुवारी मोठ्या संख्येने अर्ज दाखल झाले. दरम्यान, आज शुक्रवारी चौथ्या दिवशी बहुजन समाज पक्षाकडून विद्याधर कृष्णा गायकवाड यांनी तर गणेश शिवाजी कापसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास दि. 22 रोजीपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघात पहिल्या दिवशी 30 नामनिर्देशन पत्र वाटप झाले. दुसऱ्या दिवशी 22 नामनिर्देशन पत्र तर तिसऱ्या दिवशी 8 नामनिर्देशन पत्र वाटप झाले होते. त्यानंतर आज चौथ्या दिवशी 3 जणांनी एकूण 5 नामनिर्देशनपत्रे घेतली असून आज अखेर एकूण 65 नामनिर्देशन पत्राचे वाटप झालेले आहे. आज 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत. आज अखेर 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना निवडणूक निर्णय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी सांगितले की, आज दि. 25 अखेर खुल्या प्रवर्गातील 32, अनुसूचित जातीतील 17, अनुसूचित जमाती 0, यामध्ये अपक्ष उमेदवार 28, पक्षीय उमेदवार 21 इ. जणांनी अर्ज खरेदी केले आहेत. यामध्ये नॅशनॅलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 1 अर्ज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टीकडून 4 अर्ज, बहुजन समाज पार्टी (मायावती) कडून 1 अर्ज, शिवराज युवक संघटना (महाराष्ट्र) कडून 1 अर्ज, महाराष्ट्र नवनिर्माण सेने कडून 1 अर्ज,
वंचित बहुजन आघाडी पार्टीकडून 1 अर्ज, राष्ट्रीय समाज पक्षाकडून 1, भाजपकडून 4 अर्ज, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून 1 अर्ज, स्वाभिमानी पक्ष शेतकरी संघटणा यांचेकडून 1, शेतकरी संघटनेकडून 1 अर्ज, अपक्ष -30 असे अर्ज खरेदी केले आहेत. तसेच आज एकूण 2 उमेदवारांनी 2 नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत. आज अखेर 8 उमेदवारांनी 10 नामनिर्देशन पत्र दाखल केलेली आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून 2 उमेदवार यांनी 4 अर्ज व 6 अपक्ष उमेदवार यांनी 6 अर्ज दाखल केले आहेत.