सातारा प्रतिनिधी । सातारा स्थानिक गुन्हे शाखेचा वतीने आज धडक कारवाई करण्यात आली आहे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्या कराड तालुक्यातील दोन इसमांना जेरबंद करुन त्यांच्याकडून 2 देशी बनावटीची पिस्टल, 2 मॅक्झीन, 2 जिवंत काडतुसे, 1 मोटार सायकल व मोबाईल हॅन्डसेट असा 1 लाख 95 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त पोलिसांनी जप्त केला आहे.
सुरज गणपत चव्हाण (वय 20, रा. रेठरे बु, ता. कराड, जि. सातारा) व ओंकार युवराज थोरात (वय 25, रा. ओंड, ता. कराड, जि. सातारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री.समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची गोपनिय माहिती काढुन त्यांचेवर कारवाई करणे बाबतच्या सुचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिल्या होत्या.
त्यानंतर दि.19 रोजी पोलीस निरीक्षक श्री. अरुण देवकर यांना माहिती मिळाली की, कराड तालुक्यातील वाठार गावच्या हद्दीतील कोल्हापुर ते सातारा जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्र. 48 चे सर्व्हिस रोडवर नवनाथ महाराज यांचे मठाचे समोर रोडवर दोन इसम देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरीता येणार आहेत. यानंतर देवकर यांनी सहा. पोलीस निरीक्षक श्री. रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करुन त्यांना सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. रोहित फार्णे यांचे पथकाने कराड तालुका पोलीसांचेसह वाठार गावचे हद्दीतील नवनाथ महाराज यांचे मठाचे समोर सापळा लावला.
यावेळी त्या ठिकाणी दोन इसम हे त्यांचेकडील दुचाकीवरुन येत असताना दिसले. त्यावेळी त्यांनी दुचाकीवरील दोघांना शिताफीने पकडुन त्यांची व मोटार सायकलची झडती घेतली, त्यावेळी त्यांच्याकडे 1 लाख 95 हजार 500 रुपये किंमतीची २ देशी बनावटीची पिस्टल, २ जिवंत काडतुसे, २ मोबाईल हॅन्डसेट व १ मोटार सायकल मिळुन आले. त्यावरून त्यांचे विरुध्द कराड तालुका पोलीस ठाणे येथे गुरनं. 799/2024 भारतीय शख अधिनियम कलम 3(1), 25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदारांचे SP कडून अभिनंदन
पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप कराड तालुका पोलीस ठाणे, श्री. सहा. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, पारितोष दातीर, साक्षात्कार पाटील, पोलीस अंमलदार सफौ. शिवाजी गुरव, अतिष घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अमित सपकाळ, अमित माने, अरुण पाटील, अविनाश चव्हाण, स्वप्निल कुंभार, गणेश कापरे, मोहन पवार, ओंकार यादव, विक्रम पिसाळ, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, रवीराज वर्णेकर तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील सज्जन जगताप, उत्तम कोळी, मोहित गुरव यांनी सदरची कारवाई केली केली. कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.