सातारा प्रतिनिधी | अज्ञातांनी लावलेल्या वणव्यात दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना वाई तालुक्यातील पिराचीवाडी येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये एका शेतकऱ्याच्या मृत्यू झालेल्या एक खोंड व एका गायीचा समावेश आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाई तालुक्यात वणवे लागण्याच्या घटनामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ घडत असल्याची दिसत आहे. वनव्यामुळे येथील पसरणीचा डोंगर, मांढरदेवचा डोंगर, वैराटगडाचा डोंगर असे डोंगर पेटून काळे पडत आहेत. ते वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमींचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे.
वास्तविक वार्डच्या उत्तर बाजूला असलेल्या धावर्ड गावालगतच्या डोंगरावर अज्ञा व्यक्तींकडून रविवारी दुपारी वणवा लावण्यात आला. तो वणवा वाऱ्याच्य वेगाने भडकला. वणव्याने वाळलेल्या सागाची, शिवरीच्या झाडाना कवेत घेत रौद्र रूप धारण केले. हा वणवा त्याच गावालगत असलेल्या पीराचीवाडी येथील दशरथ कोचळे यांच्या जनावराच्या गोठ्याजवळ पोहोचला.
आगीच्या ज्वाळांनी गुरांच गोठा वेढला गेला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले; परंतु गोठ्यातील एक खोंड व एका गायीच दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, वार वनविभागाकडून वणवा आटोक्या आणण्याचे काम रात्री पर्यन्त सुरु होते.