सातारा जिल्ह्यात 23 डिसेंबरपासून क्षयरूग्ण शोध मोहिम; सर्वेक्षणासाठी 160 पथके

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणार्‍या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरूग्ण शोधमोहिम राबवली जात आहे. दि. 23 डिसेंबर ते 3 जानेवारीअखेर राबविण्यात येणाऱ्या क्षयरूग्ण शोध मोहिमेत शहरी व ग्रामीण लोकसंख्येच्या 10 टक्के म्हणजेच 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यासाठी 160 पथके तयार केली असून शहरी व ग्रामीण भागातील 64 हजार 129 घरांना भेटी दिल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात क्षयरोग निदानापासून वंचित असणार्‍या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधून काढण्यासाठी क्षयरूग्ण शोधमोहिम राबवली जात आहे. जिल्ह्याील 64 हजार 129 घरी 3 लाख 20 हजार 643 लोकसंख्येचे सर्वेक्षण आशांमार्फत करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी 160 पथके तयार केली आहेत. यामध्ये पर्यवेक्षक व 422 कर्मचारी असणार आहेत.

10 टक्के लोकसंख्येमधून 16 हजार 32 संशयित रूग्ण शोधण्यात येणार आहेत. त्यापैकी 321 क्षयरूग्ण शोधण्यात येणार आहेत. या सर्व क्षय रूग्णांना औषध उपचार व तपासणी, डीबीटीद्वारश दरमहा 1 हजार रुपये बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. तसेच दर महिन्याला फूड बास्केटही दिली जाणार आहे.

सर्व्हेक्षणासाठी आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. सर्व क्षयरोग संशयितांची थुंकी नमुना तपासणी, आवश्यक असल्यास क्ष-किरण तपासणी केली जाणार आहे.