कराड प्रतिनिधी । थोर सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आज इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. कराड तालुक्यातील टेंभू या त्यांच्या जन्मगावी असणाऱ्या अर्धकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील टेंभू (ता.कराड) गावचे सुपुत्र, थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी शिक्षण, स्त्री-स्वातंत्र्य, विधवा विवाह यासारख्या समाजाला दिशा दाखविणाऱ्या गोष्टींचा सातत्याने पुरस्कार केला. नव्या सुधारणावादी विचारांचा आग्रह धरून अन्याय, रूढी आणि परंपरा यांच्यावर त्यांनी काडाडून हल्ले चढविले. ते गाढा व्यासंग असणारे विचारवंत, पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते होते.
कराड येथील इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनच्या वतीने टेंभू ता. कराड येथे सुधारककार गोपाळ गणेश आगरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी इंद्रधनु विचारमंच फाउंडेशनचे विश्वस्त नितीन ढापरे, माणिक डोंगरे, अशोक मोहने, प्रमोद तोडकर, संदीप चेणगे व विकास भोसले यासह टेंभू गावचे लोकनियुक्त सरपंच युवराज भोईटे यांची उपस्थिती होती.