कराड प्रतिनिधी । साप्ताहिक कराड वार्ताचे संपादक इलाही मुल्ला यांचे शनिवार दि. १६ मार्च रोजी निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी कराड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने आज मंगळवारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कराड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने इलाही मुल्ला यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रमोद तोडकर, नितीन ढापरे, संदीप चेणगे, माणिक डोंगरे ,अशोक मोहने, विकास भोसले, सतीश मोरे, देवदास मुळे, अकबर शेख, सकलेन मुलाणी, विशाल पाटील, संतोष कदम, विश्वास मोहिते, ज्ञानेश्वर शेवाळे, सुनील परीट, सुरेश पवार, आस्लम मुल्ला या उपस्थित पत्रकारांनी क्षणभर मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली.
शोकसभेवेळी पत्रकारांनी ईलाही मुल्ला यांच्या विषयीच्या आठवणी जागवल्या. ईलाही मुल्ला यांनी गेली दहा वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे व सकारात्मक पत्रकारिता केली. मनमिळाऊ स्वभावाच्या ईलाही मुल्ला यांनी मोठा लोकसंग्रह जमविला होता.