सातारा ठोसेघर रस्त्यावर झाड उन्मळून पडले; दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा सज्जनगड रस्त्यावर बोगद्यातून बाहेर आल्यावर हॉटेल माउंटन व्यू नाजिक भले मोठे झाड पावसाने उन्मळून पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान ही घटना घडली असून सध्या या ठिकाणी दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली आहे.

सातारा जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडण्याच्या तसेच वीज वाहक तर तुटल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान, आज सकाळी सातारा सज्जनगड या मार्गावरून किल्ले सज्जनगड, ठोसेघर, चाळकेवाडी, परळी खोरे परिसरातील वाहतूक सतत सुरू असताना वृक्ष उन्मळून पडल्याची घटना घडली.

सध्या परळी ठोसेघर खोऱ्यात पावसाची रिपीट सुरू असून रस्त्यावर अनेक ठिकाणी दगड माती वाहून येत आहे. बोगदाचे डबेवाडी या नुकत्याच झालेल्या रस्त्यावरही ग्रीड मुळे दुचाकी वाहने सतत घसरत आहेत. सज्जनगड ठोसेघर चाळकेवाडी अलवडी या मार्गावर ही छोटी मोठी झाडे पडत आहेत.