जिल्ह्यातील हजारो रुग्णांवर 5 लाखांपर्यंत मोफत उपचार; जनआरोग्य योजनेतून दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाकडून तत्काळ अनेक चांगल्या उपचार पद्धती व दुर्गम अशा आजारावरील मोफत उपचार पद्धतीच्या योजना अंमलात आणल्या जात आहेत. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत ७ हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. त्या उपचाराच्या खर्चापोटी संबंधित रुग्णालयांना ३८,७६,४५,७८७ रुपयांच्या उपचारास मान्यता देण्यात आली आहे.

विशेष करून जेव्हा विविध आजार आणि त्यावरील खर्च हा सर्वसामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यानंतर सर्वसामान्यांवर आर्थिक संकट कोसळते, ही बाब पाहता शासनाच्या वतीने महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील २३ खासगी आणि ४ शासकीय रुग्णालयांतून रुग्णांवर उपचार केले जातात. यात चार शासकीय रुग्णालयांचा समावेश आहे.

या रुग्णालयांतून रुग्णांना सेवा मिळावी, यासाठी आरोग्यप्र प्रशासनाकडूनही जनजागृती मोहीम राबविली जात आहे. आयुष्यमान योजनेंतर्गत उपचार घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड काढणे गरजेचे आहे. हे कार्ड संबंधित रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सीएससी सेंटर, आशा कार्यकर्ती यांच्या मार्फतही काढता येते. रुग्णांनी हे कार्ड काढून घ्यावे, यासाठीही जिल्हा आरोग्य विभागातर्फे वतीने जनजागृती केली जात आहे.

‘या’ सर्वांना मिळणार लाभ

गट अ : या योजनेत पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना लाभ दिला जातो.

गट ब : पांढऱ्या रेशन कार्डधारक कुटुंबांना योजनेचा लाभ दिला जातो.

गट क : विविध आश्रमातील विद्यार्थी, अनाथाश्रम, वृद्धाश्रमातील नागरिक, बांधकाम कामगारांसह शासनाकडून सूचित करण्यात आलेल्या निकषातील लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. त्याबाबतची माहितीही वेळोवेळी आरोग्य विभाग देतो.

जिल्ह्यात आहेत ६ लाख कार्डधारक

सातारा जिल्ह्यात सुमारे २७ हजार अंत्योदय, प्राधान्य गटातील ३ लाख ९३ कार्डधारक, प्राधान्य गट नसणारे व पांढरे कार्डधारक मिळून सहा लाखांहून जास्त शिधापत्रिकाधारक आहेत.

५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण

  • महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत प्रती कुटुंब, प्रतिवर्ष 3 दीड लाख रुपयांपर्यंत उपचार केले जातात. आता १ जुलैपासून पाच लाखांपर्यंत उपचार केले जाणार आहेत.
  • आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाख २ रुपयांपर्यंतचे उपचार प्रतिकुटुंब, प्रतिवर्ष दिले जातात, त्याचाही लाभ जिल्ह्यातील रुग्ण घेतात.
  • या दोन्ही योजनांबाबत आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम. • राबविण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारी कागदपत्रेही संबंधितांना जनजागृतीतून सांगितली जातात.