सांगलीतील बैठकीतून वाहतूकदार संघटनांनी दिला थेट इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सध्या माल वाहतूक व्यवसायिकांच्या संघटनानी मालवाहतुकीमध्ये जबरदस्तीने वसूल केल्या जाणाऱ्या वाराईविरोधात दंड थोपटण्यात आले असून निर्णय मागे न घेतल्यास चक्काजाम आंदोलन करू, असा थेट इशारा दिला आहे. सांगली, शिरोळ, सातारा, कराड, कोल्हापूर, वाठार येथील सर्व वाहतूकदार संघटनांची सांगली येथे नुकतीच महत्वाची बैठक पार पडली. यावेळी मोठ्या संख्येने वाहतूक व्यावसायिक उपस्थित होते. या बैठकीत शासनाच्या जुलमी निर्णयाविरोधात व्यवसायिकांनी संताप व्यक्त केला.

सांगलीत पार पडलेल्या बैठकीत मालवाहतूक क्षेत्रातील समस्या, ओव्हरलोड, भाड्याचे दर, भ्रष्टाचार आदी विषयांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांतील संघटनांनी एकत्र येण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. यावेळी वाराईविरोधात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांत चक्का जाम करण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

यावेळी बैठकीचे संयोजन सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले होते. ट्रक, टेम्पो, बस, टँकर महासंघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पुढील लढाईसाठी एकजुटीचे आवाहन केले. ऑल इंडिया मोटार काँग्रेसचे कार्यकारी संचालक बाळासाहेब कलशेट्टी यांनी सांघिक लढ्याची रूपरेषा स्पष्ट केली.