सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त सातारा ते पंढरपूर अन् वडूज ते फलटण राज्यमार्गाच्या वाहतुकीत बदल

0
1

सातारा प्रतिनिधी । पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज यात्रा दि. 25 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत भरत आहे. या यात्रेनिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 34 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारान्वये पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीतून जाणारा सातारा ते पंढरपूर व वडूज ते फलटण या राज्यमार्गाच्या वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.

सातारा बाजूकडून दहिवडी बाजुकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता नेर, ललगुन, बुध, राजापूर/ कुळकजाई, मलवडी मार्गे दहिवडीकडे जातील. किंवा सातारा बाजूकडून दहिवडी बाजुकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न जाता विसापुर फाटा, जाखणगाव, खातगुण, कटगुण मार्गे दहिवडीकडे जातील. दहिवडी बाजूकडून येणारी वाहने कटगुण, खातगुण, जाखणगाव मार्गे विसापुर फाट्यावरून साताराकडे जातील. किंवा दहिवडी बाजूकडून येणारी वाहने मलवडी, कुळकजाई, राजापुर, ललगुन, नेर मार्गे साताराकडे जातील.

वडूज बाजूकडून फलटण बाजूकडे जाणारी वाहने पुसेगाव गावात न येता, खातगुण, जाखणगाव, विसापुर फाटा, ते नेर ललगुन मार्गे फलटणला जातील. फलटण बाजुकडून वडूज बाजुकडे जाणारी वाहने नेर, ललगुन, विसापुर फाटा, जाखणगाव, खातगुण, मार्गे वडूजकडे जातील. शिवाजी चौक, पुसेगाव येथून दहीवडी बाजुकडे, वडूज बाजूकडे, फलटण बाजूकडे, सातारा बाजूकडे (चौकापासून चारही बाजूस) २०० मीटर अंतरापर्यंत नो पार्किंग झोन राहील. वाहतुक मार्गात केलेल्या बदलांसाठी सर्व नागरीकांनी व वाहन चालकांनी नोंद घेवून पोलीस दलास सहकार्य करावे.