सातारा पालिकेच्या लेखापाल शेख यांची बदली, ‘या’ अधिकाऱ्याकडे प्रभारी कार्यभार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एकीकडे सातारा शहराच्या विकास कामाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला अर्थसंकल्प उद्या पालिका प्रशासनाकडून सादर केला जाणार आहे. या दरम्यान सातारा नगरपालिकेच्या लेखापाल शबनम शेख यांची सहसंचालक वित्त व कोषागार विभाग कार्यालय, पुणे येथे एक कारणावरून सक्तीची बदली करण्यात आली. याबाबतचा आदेश वित्त व कोषागार संचालनालयाच्या सहायक संचालक दीपा पाटील यांनी गत आठवड्यात काढला आहे.

शेख यांची पाच महिन्यांपूर्वी सातारा पालिकेत लेखापाल म्हणून नियुक्ती झाली होती. सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडकर यांनी लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली होती. या प्रकरणावरून शेख यांची पालिकेत गोपनीय चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान शेख यांचा कार्यभार काढून घेण्यात आला होता.

प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी शेख यांची सुनावणी घेऊन त्या संदर्भातील सविस्तर अहवाल वित्त व कोषागार विभागाचे मुख्य सचिव एन. रामास्वामी यांना पाठवला होता. वित्त व कोषागारे सहसंचालक कार्यालय, पुणे येथे सक्तीने बदली केली. सातारा पालिकेचे लेखा परीक्षक महेश सावंत यांच्याकडे लेखापाल पदाचा प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला आहे.