कराडचे मुख्याधिकारी खंदारेंची बदली; ‘हे’ अधिकारी पाहणार आता कामकाज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | कराड नगरपालिकेत मुख्याधिकारी टिकेनात अशी सद्या अवस्था झाली आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी शंकर खंदारे यांची अकोला महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे कराड त्यांना नुकतेच मुख्याधिकारी पदावरून कार्यमुक्त करण्याचे आदेश सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी रात्री देण्यात आले. त्यामुळे खंदारे यांच्या जागी आता फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे कामकाज पाहणार आहेत.

कराड पालिकेच्या मुख्याधिकारी पदी शंकर खंदारे यांची एक महिन्या पूर्वी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी येथील कामकाज काही दिवस पाहिले. दरम्यान, महिनाभर कामकाज पाहिल्यानंतर अकोला येथे त्यांची अतिरिक्त आयुक्त या पदावर बदली करण्यात आली आहे.

फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड हे पुढील आदेश येईपर्यंत कराडचे मुख्याधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. संजय गायकवाड यांनी फलटणमध्ये केलेली अतिक्रमण हटाव मोहीम राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती.