कराडात निवडणूक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण; 34 पथकांची नियुक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा या महिन्यात होणार असल्याने सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे. यामध्ये प्रशासनाकडून देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी केली जात आहे. कराड उत्तर व दक्षिण विधानसभा निवडणूक प्रशासनातर्फे निवडणुकीशी संबंधित विविध पथकांसाठी प्रशिक्षणवर्ग नुकताच घेण्यात आला. या प्रशिक्षणवर्गासाठी दोन्ही मतदारसंघांतील पथकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कराड उत्तर व दक्षिण विधानसभा मतदारसंघांतर्फे निवडणूक आयोगाच्या आदेशाने स्थिर पथके, भरारी पथके व व्हिडीओ सर्वेक्षण पथके यांची एकूण ३४ पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकातील मध्यवर्ती अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सचित्र संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले. तसेच एकूण मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रे, मतदारांना पुरवल्या जाणाऱ्या विविध सुविधा, आचारसंहिता कक्ष, एक खिडकी योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणुकीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे, असा आदेश कराड उत्तर विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण व कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी कर्मचाऱ्यांना दिला. प्रशिक्षणवर्गास तहसीलदार कल्पना ढवळे, तहसीलदार स्मिता पवार, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, परिविक्षाधीन तहसीलदार अनिकेत पाटील, मुख्याधिकारी शंकर खंदारे आदी उपस्थित होते.