सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थीची बॉक्सींग व कुस्ती स्पर्धेमध्ये सुवर्णसह कास्य पदकांची कमाई

0
32
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीनी भुसावळ येथे झालेल्या अखिल भारतीय निमंत्रित बॉक्सींग स्पर्धा ०४ सुवर्ण, ०६ रौप्य व ०३ कांस्य पदके प्राप्त केली. तसेच इंदापुर येथे झालेल्या अजिंक्य राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेमध्ये ०१ सुवर्ण, ०१ रौप्य पदके प्राप्त करुन भरघोस यश संपादन केले आहे.

दरम्यान, दि.०६/११/२०२४ ते दि.१०/११/२०२४ रोजी भुसावळ येथे राणी लक्ष्मीबाई १ ली अखिल भारतीय निमत्रिक बॉक्सींग स्पर्धा घेण्यात आली. तर दि.०९/११/२०२४ ते दि.१०/११/२०२४ रोजी इंदापुर जि. पुणे येथे अजिंक्य राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा घेण्यात आली.

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी येथे प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी यांना स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक श्री सुनिल सपकाळ, सहा. स्पोर्ट इन्चार्ज / प्रबोधिनी व्यवस्थापक सॅम्युअल भोरे, एन.आय.एस बॉक्सींग प्रशिक्षक पोहवा/१९० सागर जगताप व महिला प्रशिक्षक मपोकॉ/८४ पुजा शिंदे, पोकॉ/२६७७ सागर भुजबळ (कुस्ती प्रशिक्षक), पोकॉ/१८१७आदित्य इंजेकर (कुस्ती प्रशिक्षक), मपोकॉ/१३६० धनश्री मांडवे, (कुस्ती प्रशिक्षक), यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रशिक्षण दिले.

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनी मधील पदक प्राप्त प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षक यांचे उल्लेखनिय कामगिरी बाबत पोलीस अधीक्षक श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, पोलीस उप-अधीक्षक (गृह) श्री. अतुल सबनीस, राखीव पोलीस निरीक्षक श्री. राजु शिंदे, पोलीस उप-निरीक्षक श्री सुनिल चिखलेयांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

बॉक्सिंग स्पर्धा

सुवर्ण पदक – १. रिया निलेश शिंदे (३०-३२ किलो गट),
२. समृद्धी सतिश शिंदे (५२-५५ किलो गट)
३. यशदा अमरसिंह भोसले (६०-६३ किलो गट)
४. श्रुती सचिन शिंदे (६६-६९ किलो गट)

रौप्य पदक – १. अनुष्का पुष्पक कुंभार (२२-२४ किलो गट)
२. गार्गी रमेश चव्हाण (४९-५२ किलो गट)
३. अक्षरा गणेश पवार (४३-४६ किलो गट)
४. जानवी भरत कडव (६३-६६ किलो गट)
५. स्वराली अतुल पवार (६७+ किलो गट)
६. दिपाली बाळासाहेब भिसे (५२-५४ किलो गट)

कांस्य पदक – १. समृद्धी विकास शिंदे (४६-४९ किलो गट)
२. श्रावणी जितेंद्र भोसले (५४-५७ किलो गट)
३. आराध्या महादेव धनवडे (३८-४० किलो गट

अजिंक्य राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धा

सुवर्ण पदक – १. साक्षी मोहन धुमाळ (५४ किलो गट) राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेकरीता निवड

कांस्य पदक – १. केतकी सतीश जाधव (६२ किलो गट)