पुणे-बंगळूर महामार्गावरील खंबाटकी घाटात पुन्हा खोळंबली 4 तास वाहतूक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खंबाटकी घाटातील दत्त मंदिराजवळ ट्रक बंद पडल्यामुळे सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक तब्बल ४ तास खोळंबली होती.

एक माल ट्रक गुरुवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास खंबाटकी घाटातील सहाव्या वळणावरून दत्त मंदिर परिसरातून निघाला होता. यावेळी ट्रक अचानक बंद पडला. या ठिकाणी दोनच लेन असल्या कारणाने तसेच गाड्यांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. याची माहिती मिळाल्यानंतर सकाळी महामार्ग पोलीस व ट्राफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सकाळी साडे सहा ते दहा वाजेपर्यंत घाटातील वाहतूक बोगदा मार्गे वळविली. यानंतर बंद पडलेला ट्रक बाजूला करत घाटातील वाहतूक सुरळीत केली.

दरम्यान, आज धनगर आरक्षणासाठी आज महामार्ग रोखण्याचा इशारा धनगर समाज बांधवांकडून देण्यात आलेला आहे. आज पारंपरिक वेशभूषा करुन धनगर बांधव शेळ्या-मेंढ्यांसह महामार्गावर उतरणार आहेत. अशात महामार्ग रोखल्यास खंबाटकी घाटात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होणार आहे.